कौतुकास्पद! या कॉलेजला मिळाले ‘फोर स्टार’ मानांकन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  भारत सरकार शिक्षण मंत्रालयाच्या ‘इन्स्टिट्युशन्स इंनोविशन कौन्सिल’ या संस्थेंतर्गत महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण उपक्रम, संकल्पना व संशोधन असे

उपक्रम राबविलेबद्दल मुळा एज्युकेशन सोसायटीचे सोनई येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास राष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे समजले जाणारे ‘फोर स्टार’ मानांकन प्राप्त झाले आहे.

सन २०१९-२० साठी संपूर्ण भारतातून एकूण एक हजार सहाशे महाविद्यालये, विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्था यांनी यात सहभागी होते.

देशातील आठ विभागापैकी पश्चिम विभागातून (महाराष्ट्र व गोवा) सोनई महाविद्यालय ‘फोर स्टार’ मानांकन मिळून विभागीय पातळीवर 38 व्या क्रमांकावर व पुणे विद्यापीठात व नगर जिल्ह्यात असलेल्या

अव्यावसायिक महाविद्यालयामध्ये सोनई महाविद्यालय हे प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे ‘नवउद्योजक घडवणारे महाविद्यालय’ असा नावलौकिक महाविद्यालयास प्राप्त झाला आहे.

यासाठी महाविद्यालयाने बौद्धिक संपदा कार्यशाळा, सामाजिक उद्योजकता व नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धा हे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यातून विद्यापीठ स्तरावरील क्लस्टर स्पर्धेमध्ये तीन विद्यार्थी सहभागी झाले होते.

या यशाबद्दल राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व यश ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी ‘टीम सोनई महाविद्यालय’चे अभिनंदन केले आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment