दोन तलवारीसह अंबर दिवा बाळगणारा जेरबंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- टाकळी खंडेश्वरी येथील घरात व गाडीत घातक शस्त्रासह अंबर दिवा बाळगणाऱ्या व्यक्तीस डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांनी जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव रात्री गस्तीवर असताना त्यांना गुप्त बातमी दादा मार्फत माहिती मिळाली की टाकळी खंडेश्वरी येथील सपकाळ वस्ती येथे दत्तू मुरलीधर सकट हा विनापरवाना बेकायदा घातक दोन लोखंडी तलवारी स्वतःचे घरात व गाडीत जपून ठेवले आहेत.

सदरची माहिती मिळताच गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी जाधव यांनी तात्काळ त्यांच्याकडील पोलीस कर्मचाऱ्यांची पथकाला बोलावून टाकळी खंडेश्वरी गावातील सपकाळ वस्ती येथे जाऊन आरोपीचे राहते घराची व त्याचे घरासमोर लावलेली फिक्कट पांढर्‍या रंगाची टाटा सफारी गाडी नंबर एम एच सोळा 48 33 याची झडती घेतली असता

या गाडीमध्ये लोखंडी धातूची पितळाच्या धातूची मूर्ती असलेली तलवार व एक नारंगी रंगाचा अंबर दिवा तसेच त्याचे घरात लोखंडी धातूची मूर्ती असलेली सिल्वर कलर असलेली तलवार मिळून आली.

सदर आरोपी ताब्यात मिळालेल्या मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेऊन पोलीस कॉन्स्टेबल आदित्य बेडेकर यांचे फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment