Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar SouthCorona Virus Marathi News

जिल्ह्यात काल आढळले ‘इतके’ कोरोना रुग्ण,दोन जणांचा झाला मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात तीन महिन्यांनंतर प्रथमच सर्वात कमी १८२ कोरोना रुग्ण शुक्रवारी आढळले. दोन जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ८२ रुग्ण आढळून आले.

उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १३७५ आहे. ८६१ जणांचा बळी गेला होता. शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २१, खासगी प्रयोगशाळेत ५७ आणि अँटीजेन चाचणीत १०४ बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयात मनपा १२, अकोले २, नगर ग्रामीण १, नेवासे १, पारनेर १, पाथर्डी २, राहुरी १ रुग्णाचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत मनपा २२, अकोले ५, जामखेड २, कर्जत १, कोपरगाव ५, नगर ग्रामीण १, पारनेर १,पाथर्डी १, राहाता ५, राहुरी १, संगमनेर ८, श्रीगोंदे २, श्रीरामपूर ९ रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा १२, अकोले १३, जामखेड ९, कर्जत ९, कोपरगाव २, नगर ग्रामीण ३, नेवासे ५, पारनेर २, पाथर्डी १८, राहाता ३, संगमनेर २, शेवगाव १८, श्रीगोंदे ४ आणि श्रीरामपूर ४ रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी २६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ८४६ झाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button