मोठी बातमी : गुजरातमध्ये पहिली सी प्लेन सेवेला सुरुवात ; मोदी बनले पहिले प्रवासी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये देशातील पहिल्या सी प्लेन सर्व्हीसचे उद्घाटन केले.

त्यांनी गुजरातमधील केवडीयातील सरदार सरोवर ते अहमदाबादच्या साबरमती रिव्हर फ्रंटपर्यंत उड्डाण करुन या सेवेचे उद्घाटन केले. ही सेवा सुरु झाल्यानंतर गुजरातमध्ये पर्यटनाला चालना मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी केवडीयामधून सी प्लेनच्या पहिल्या फ्लाईटमध्ये प्रवास करत साबरमती रिव्हर फ्रंटला गेले.

भारतात सी प्लेन सेवेची सुरूवात पर्यटनाला चालना देईल. आता ही सेवा केवडिया ते अहमदाबाद पर्यंत सुरू केली जात आहे. यामुळे केवड़िया ते अहमदाबादला जाण्यासाठी लागणारा वेळ अत्यंत कमी करण्यात आला आहे.

केवडिया ते अहमदाबाद हे अंतर पार करण्यासाठी सी प्लेन सुमारे 45 मिनिटे घेईल. या दोन ठिकाणांमधील अंतर सुमारे 200 किलोमीटर आहे. आतापर्यंत हे अंतर पार करण्यासाठी सुमारे 4-5 तास लागत होते.

ही सेवा अहमदाबाद ते केवडीया मार्गासाठी असेल. यासाठी 1500 रुपयांपासून तिकीट भाडे असेल. सी प्लेन साठी तिकीटाचे बुकींग www.spiceshuttle.com या वेबसाईटवरुन केली जाऊ शकते.

या सेवेसाठी तिकीट 1500 रुपयांपासून सुरु होत असून 30 ऑक्टोबर नंतर स्पाइस शटलच्या वेबसाईटवरुन बुकींग केलं जाऊ शकतं. ही सी प्लेन सेवा स्पाइसजेटची सहयोगी कंपनी स्पाइस शटलद्वारे देण्यात येईल.

स्पाइसजेट दररोज दोन सी प्लेन ची वाहतुक करेल. प्रत्येक फ्लाईटचे अवधी साधारण तीस मिनिट असेल. देशातील अनेक शहरांमध्ये सी प्लेन सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

हे फार लांब असणे आवश्यक नाही. याशिवाय सी प्लेन वजनात हलके आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तेथे सी प्लेन सुरू करण्याची योजना आखली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment