भाजपला खिंडार; श्रीरामपूरच्या 257 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-  उत्तर नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीला, खिंडार पडले असून, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडी मान्य नसल्याने श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अध्यक्ष यांच्या नियुक्तीच्या विरोधात,भारतीय जनता पार्टीच्या २१३ बूथ प्रमुख, तसेच ४४ शक्ती प्रमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा देत, भारतीय जनता पार्टी संचालन समितीची स्थापना करण्यात आलीय, ज्यामुळे आगामी काळात भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता पार्टी संचालन समिती असा संघर्ष पाहायला मिळणार आहे .

श्रीरामपूर येथे स्वयंवर मंगल कार्यलयात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषेद घेऊन माहिती दिली या वेळी हातात काळे झेंडे घेऊन काळ्या फिती बांधून झालेल्या कार्यकर्त्यांच्या निवडीचा निषेध करण्यात आला.

या संदर्भात वरिष्ठ अधिका-यांचा निर्णय कोणताही असो मात्र ,उत्तर जिल्हाध्यक्ष गोंदकर तसेच तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली काम न करण्याचा निर्णय,भाजपा संचालन समितीच्या माध्यमातून नगरसेवक किरण लुनिया यांनी व्यक्त केलाय.

भारतीय जनता पार्टीचे गेली 30 वर्षपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलून, असंवेधाणीक मार्गाने ह्या नियुक्ती करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आलाय.

257 भाजपच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठवण्यात आले असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यानी दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment