तुम्हालाही वेगवेगळ्या प्रकारचे वडे खायला आवडतात तर बनवायला शिका मसाला वडा; जाणून घ्या रेसिपी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- जेव्हा वातावरण पावसाचे असेल आणि जर त्या वातावरणात भजी खायला भेटली, मग तर गोष्टच वेगळी असते? पावसाळ्यात, जास्तकरून काही तिखट आणि चट्पट असे पदार्थ खावेसे वाटतात.

आज आम्ही तुम्हाला एका रेसिपीबद्दल सांगणार आहोत जी मसालेदार आणि भजींसारखी कुरकुरीत आणि चट्पट देखील आहे. आपल्याला असे म्हणता येईल की पावसाळ्यात खाण्यासाठी योग्य रेसिपी म्हणजे मसाला बडा.

आवश्यक साहित्य :

  • चणा डाळ – 1 कप (200 ग्रॅम)
  • हिरव्या मिरच्या – 4 किंवा 5
  • अदरक – १ इंचाचा तुकडा
  • कोबी – 1 कप ( किसून घेतलेली )
  • मीठ – 1 चमचा
  • 1 लाल मिरची – कापून घेतलेली
  • धणे पावडर – 1 चमचा
  • जिरे – १/२ चमचा गरम मसाला – 4 चमचे
  • कोथिंबीर
  • बेसन पीठ – ½ कप (100 ग्रॅम)

कृती : मसाला वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम १ कप चण्याची डाळ पाण्यात ४ ते ५ तास भिजवून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात ४ ते ५ हिरव्या मिरच्या आणि १ अदरक चा तुकडा टाकून वाटून घ्या.

मिरची आणि अदरक मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर त्यात एक वाटी भिजवलेली चण्याची डाळ टाकून डाळ थोडी जाड राहील असे मिक्सरमधून बारीक करून घ्या.

(डाळीत पाणी न घालताच मिक्सरमधून बारीक करून घेणे ). एका भांड्यात बारीक केलेली डाळ काढा आणि बाकी उरलेली संपूर्ण डाळ त्यात टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या.

आता त्यात १ वाटी किसलेली कोबी, १ टिस्पून मीठ, १ टिस्पून कापून घेतलेली लाल मिरची , १ टीस्पून धणे पावडर , २ टीस्पून जिरे, ½ टीस्पून गरम मसाला आणि १ ते २ चमचा हिरवी कोथिंबीर टाका.

आता बाईंडिंगसाठी मिश्रणात 1 कप बेसन पीठ टाका ( जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही बेसन पीठाऐवजी रवा किंवा तांदळाचे पीठदेखील घेऊ शकता).

आता या मिश्रणाचे छोटे गोळे बनवून ते पसरवून वड्याच्या आकाराचे होतील असे मोठे बनवा (वडे मोठे करताना हाताला तेल लावा, जेणेकरून हे मिश्रण हातात चिकटणार नाही).

अशा प्रकारे सर्व वडे मोठे बनवा आणि त्यांना बाजूला ठेवा (आपण आपल्यानुसार वडे छोटे किंवा मोठे बनवू शकता). वड्यांना तळण्यासाठी फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करा

आणि मध्यम आचेवर वड्यांना सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. गरम-कुरकुरीत वडे तयार आहेत. आपण हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करू शकता.

सूचना : डाळीला मिक्सरमधून वाटून घेताना ती जाड वाटली जाईल याची काळजी घेणे जर डाळ जाड असेल तरच वडे कुरकुरीत होतील. डाळ वाटून घेताना त्यात पाणी टाकू नये . तेल गरम करताना गॅस मोठा ठेऊ शकता पण वडे तळत असताना गॅस मंद आचेवर ठेवणे .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment