महापौरांचा इशारा ; दिवाळीपूर्वीच पथदिवे सुरू करा, अन्यथा …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- दिवाळीपूर्वी महानगरपालिकेने अनेक निर्णय घेत नागरिकांना दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. आता महापौरांनी दिवाळीपूर्वीच शहरातील पथदिवे सुरू करावेत तसेच दिवाळीत विद्युत विभागातील कर्मचार्‍यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पथदिवे सुरू करण्यासंदर्भात महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, उपायुक्त डॉ. प्रदिप पठारे, इलेक्ट्रीक विभाग प्रमुख राजेंद्र मेहेंद्र, वायरमन व कर्मचारी उपस्थित होते.

नगरसेवकांच्या निधीतून मागविण्यात आलेले साहित्य लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तातडीने बीओटी तत्वावर एलएडी व रिपेअरिंगची कामे हाती घेतली जाणार असून लवकरच ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे. कर्मचार्‍यांनी कोणतेही कारण न सांगता व सुटी न घेता दिवाळीपूर्वी शहरामध्ये सर्व ठिकाणी लाईट चालू करावी,

अन्यथा अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येइल असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, दिवाळीच्या तोंडावर महापालिकेने नगरकरांना शास्तीमाफीची घसघशीत भेट दिली आहे. नोव्हेंबर महिन्यासाठीच शास्तीमाफीचा निर्णय असून तब्बल 75 टक्के शास्तीमाफी मिळणार आहे.

आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी ही माहिती दिली. नगरकरांना थकबाकी भरून शास्तीमाफीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment