‘त्या’ डिझेल प्रकरणात एकाला अटक; यातील ‘भाई’ समोर येणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- मागील आठवड्यात शहरातील जीपीओ चौक येथे केलेल्या डिझेल कारवाईचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडून काढून तो शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे देण्यात आला आहे.

डॉ. राठोड यांच्या पथकाने छापा टाकून छाप्यात सुमारे 2 हजार लिटर डिझेल जप्त करत गौतम बेळगे या आरोपीला अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी रात्री आणखी एका आरोपीला अटक केली आहे. कोर्टातून त्याला पीसीआर मिळाला आहे.

दरम्यान जप्त केलेल्या डिझेल नमुने तपासणीचा अहवाल अजूनही पोलिसांना प्राप्त झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. अटकेतील या आरोपीकडून बेळगेने टँकर विकत घेत त्यात बदल केले होते. हे बदल कोणाच्या आदेशाने केले, त्याला परवानगी होती का? तसेच राहुरीच्या ‘त्या’ पेट्रोलपंपाचाही शोध घेतला जात आहे.

नव्याने अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना भेसळ रॅकेटची चेन मिळते का? याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात यापूर्वी नाप्त्यापासून बनावट पेट्रोलसह बनावट डिझेल तयार करण्याचे ठिकाणे पोलिसांनी पकडलेले आहेत. यात जामखेड, सुपा येथे हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले होते.

वांबोरीत देखील नाप्त्यापासून बनावट पेट्रोल तयार करण्यासाठी साहित्याचा साठा तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संदीप जाधव यांनी पकडला होता. या घटनेला अनेक वर्षांचा कालावधी लोटला असला तरी या जुन्या संदर्भाचा आधार घेतल्यास राहुरी तालुक्यातून बरीच माहितीसमोर येण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी योग्य दिशेने तपास केल्यास हे प्रकरण राहुरी भोवती फिरणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे खरा सूत्रधार हा राहुरीतीलच असून तो ‘भाई’ असल्याची चर्चा आहे. राहुरीतूनच भेसळीचे सगळी सूत्रे हालतात की मुंबई,गुजरातपर्यंत लिंक निघते हे पोलीस तपासाअंती समोर येणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment