कांदा रिव्हर्स ; जिल्ह्यात कांद्याला ‘इतका’ भाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- ppया महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढायला लागले. २० ते २५ रुपये किलो असलेला कांदा ७० रुपये किलोपर्यंत पोहचला. परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही बसला असल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.

अती पावसामुळे वाया गेलेले कांदा पीक व रोपे त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाले. राज्यातील कांद्याची स्थिती पाहता येत्या काही दिवसांत कांदा शंभरी गाठणार असल्याची शक्यता घाऊक

व्यापाऱ्यांनी वर्तवली असतानाच कांद्याने पुन्हा रिव्हर्स गिअर टाकला आहे. केंद्र सरकारने कांद्याची आयात केल्याने त्याचे परिणाम नगर जिल्ह्यातही जावणू लागले आहेत.

कांद्याच्या दरातील वाढ थांबली असून काल शनिवारी 1000 ते 8000 रूपयांचा दर मिळाला. वांबोरी उपबाजारात उन्हाळी कांद्याला 1000 ते 7000,

कोपरगाव बाजार समिती आवारात 1500 ते 6262, घोडेगावात 1000 ते 6500, नगरला 1000 ते 8000 तसेच वैजापूरात 1500 ते 7000 आणि लासलगाव बाजारात 1060 ते 6195 असा भाव निघाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment