रिक्षाचालकाचा मृतदेह ११ दिवसानंतर सापडला !

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- निघोज कुंड येथील कुकडी नदीपात्रात पाय घसरून पडलेल्या इसाक तांबोळी या रिक्षाचालकाचा मृतदेह ११ दिवसानंतर शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास आढळून आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी दिली.

दरम्यान, इसाकचा मृतदेह सापडत नसल्याने वडील रहेमान हे चिंतेत होते. दररोज वाट पाहूनही काहीच निरोप येत नसल्याने त्यांच्या मनात घालमेल सुरू होती.

अखेर गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. रांजणगांव गणपती येथील इसाक रहेमान तांबोळी त्याची रिक्षा भाडे घेऊन जवळे येथे आला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved