अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाबत होतंय असे काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहेत नगर शहर व जिल्ह्यात शनिवारी २६० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ५४ हजार ५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात एकही मृत्यूची नोंद नाही. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात शनिवारी २०७ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ५३ इतकी झाली आहे. नगर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजले पासून शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६० ने वाढ झाली.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४२८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४८ आणि अँटीजेन चाचणीत १६९ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४, जामखेड १, कोपरगाव १, नगर ग्रामीण ९, नेवासे २, पारनेर ३, पाथर्डी २ आणि इतर जिल्हा १ रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, अकोले २, कोपरगाव ३, नगर ग्रामीण २, नेवासा १, पारनेर २,पाथर्डी २, राहाता ५, राहुरी २, संगमनेर १२, शेवगाव १, श्रीरामपूर १, कॅंटोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत १६९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा ९, अकोले १०, जामखेड १, कर्जत ५, कोपरगाव ३, नगर ग्रामीण १, नेवासा १२, पारनेर २४, पाथर्डी १०, राहाता ८, राहुरी ५, संगमनेर ५७, शेवगाव ३, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर ६, कॅंटोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Leave a Comment