बॅण्ड बाजासह घोडागाडीदेखील झाली मोर्चात सहभागी

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे विविध सर्वाजनिक कार्यक्रमांवर शासनाने बंदी घातल्याने त्यावर अवलंबून असणार्‍या लाखो लोकांचा रोजगार ठप्प झालेला आहे.

टप्प्याटप्याने शासनाने सर्व गोष्टी सुरु केल्या आहेत. परंतु मंगल कार्यास फक्त 50 लोकांच्या उपस्थितीची अट अजूनही कायम आहे. ती रद्द करुन 500 लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी द्यावी.

तसेच इतर काही मागण्यांसंदर्भात मंगल कार्यालय चालकांनी आज जिल्हाधिकरी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. दरम्यान हा मोर्चा उत्सव सोहळे संघर्ष समिती अहमदनगर, जिल्हा मंडप, लाईट,

फ्लॉवर्स डेकोरेडर्स व्यवसायिक असोसिएशनच्यावतीने काढण्यात आळा होता. यावेळी जिल्ह्यातील संबंधित व्यवसायिकांनी निदर्शने करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर गेल्या आठ महिन्यांपासून शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर लॉन्स, कार्यालयातील कार्यक्रमांवर उपस्थितीवर बंधने असल्याने त्यावर टेन्ट, मंडप, केटरिंग,

मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉल, डि.जे., साऊंड, लाईट, डेकोरेटर, इव्हेंट, फोटोग्राफर, आर्केस्ट कलावंत, आचारी, पुरोहित, आर्केस्ट्रा, प्रिंटींग प्रेस, आदि अवलंबून आहेत. पर्यायाने त्यांच्या कुटूंबीयांवर उपासमारीचे वेळ आली आहे.

त्यामुळे ते मानसिक तणावाखाली असून, आत्महत्या करण्यास प्रेरित होत आहे. शासनाच्यावतीने बर्‍याच गोष्टीं सुरु केल्या आहेत. कार्यालय, लॉन्स सुरु केले यामध्ये आता मर्यादा संख्या 500 पर्यंत वाढवावी किंवा कार्यालय,

लॉन्स, हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत करण्यात यावी. या मागणीसाठी राज्यस्तरीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत सरकारला वेळोवेळी आंदोलन, निवेदने दिली आहेत.

परंतु यावर अजुनही सरकारने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास या व्यवसायावर अवलंबून असणार्‍यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, तरी सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा,

असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शहराचे आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, शिवसेना शहराध्यक्ष दिलीप सातपुते, विक्रम राठोड, बाहासाहेब बोराटे,

संभाजी कदम आदिंनी या ठिकाणी येऊन संघटनेस पाठिंबा दर्शविला आहे. तसेच या आंदोलनप्रसंगी सर्वांनी काळा टी-शर्ट व काळा मास्क घालून सरकारचा निषेध नोंदविला. या मुकमोर्चात बँड, घोडे, बग्गीसह सहभागी झाले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved