रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याची गरज- संदीप गुंड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-नगर -शेतीमाल खरेदी व विक्री च्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण कराव्यात असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संदीप गुंड यांनी केले.

शिंदे परिवाराच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या वेदिका ट्रेडर्स व फ्रुट मर्चंट या शेतीमाल खरेदी विक्री दुकानाचे मेहकरी फाटा येथे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस केशव बेरड, संचालिका वैशाली शिंदे, प्रा.विजय शिंदे उद्योजक संदीप सोनावणे, प्रमोद गांधी, सुनील शिंदे,

प्रगतिशील शेतकरी सुनील जावळे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते पुढे म्हणाले कि शिंदे परिवाराने डॉ शरद कोलते इंग्लिश मिडीयम स्कुल च्या माध्यमातून या परिसरातील मुलांसाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना देखील त्याच्या या अभिनव उपक्रमाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

वेदिका ट्रेडर्स च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला शेतमाल भाजीपाला, फळे यासाठी जवळच एक केंद्र सुरु झाल्यामुळे वेळेची व खर्चाची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे उत्तम मालाला परदेशात पाठवण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे. हि जमेची बाजू आहे.

वेदिका ट्रेडर्स च्या संचालिका वैशाली शिंदे यांनी माहिती देताना सांगितले कि या केंद्राच्या माध्यमातून मेहेकरी परिसरातील शेतकऱ्यांकडून रोज दुपारी चार नंतर याठिकाणी भाजीपाला व फळे विकत घेतले जाणार असून पुणे, मुंबई, नाशिक येथे पाठवला जाणार आहे. त्याचप्रमाणे ऑन लाईन फळे व भाजीपाला विक्री देखील भविष्यात सुरु करण्याचे नियोजन आहे.

त्यामुळे अतिशय कमी उत्पादन असणारा शेतकरी व जास्तीत जास्त उत्पादन असणारा शेतकरी देखील याठिकाणी आपला माल विकू शकतो. केंद्र शासनाच्या एक्स्पोर्ट विभागाची परवानगी देखील लवकरच मिळणार असून हा भाजीपाला किंवा फळे थेट परदेशात पाठवण्याची प्रक्रिया देखील या ठिकाणी सुरु होणार आहे.

केशव बेरड या प्रसंगी म्हणाले की ,केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते व त्यांनी देखील समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले तर आभार ईश्वर तनपुरे यांनी मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment