Ahmednagar CityBreakingMaharashtra

समाजाला दिशा देण्याचे काम माध्यम करतात -अ‍ॅड. धनंजय जाधव

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- समाजाला दिशा देण्याचे काम माध्यम करीत असतात. तर प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेऊन समाजाला जागृत करण्याचे त्यांचे कार्य अविरतपणे सुरु असते.

कोरोनाच्या संकटकाळात देखील जीवावर उदार होऊन त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. पत्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी यांनी कोरोना योध्दांची भूमिका पार पाडली.

इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने पत्रकार सभासदांसाठी घेण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना श्री साई द्वारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी व्यक्त केली.

श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट व अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींना दिवाळी भेट म्हणून किराणा किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी अ‍ॅड. जाधव बोलत होते. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष उमेर सय्यद, उपाध्यक्ष कुणाल जायकर, सचिव लैलेश बारगजे, सहसचिव रोहित वाळके, खजिनदार निखिल चौकर, सागर दुस्सल, सुशील थोरात,

सचिन अग्रवाल, संजयकुमार पाठक, डॉ. विक्रम पानसंबळ, राहुल मुथा, सोनू बोरुडे आदींसह वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुढे अ‍ॅड. जाधव म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात अनेकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.

अनेकांच्या नोकर्‍या गेल्या तर काहींच्या वेतनात मोठी कपात झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना जगणे कठिण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

वृत्तवाहिनींचे प्रतिनिधी घराबाहेर पडून कोरोनाची प्रत्येक बातमी व कोरोनापासून बचाव करण्यासाठी कश्या पद्धतीने सतर्क रहावे याची वेळोवेळी माहिती समाजापुढे मांडत होते.

दरम्यान कोरोनाच्या टाळेबंदीचा फटका सर्वसामान्यांसह वृत्तवाहिनीत काम करणार्‍यांना देखील बसला असल्याने सामाजिक भावनेने दिवाळी सण गोड होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष उमेर सय्यद म्हणाले.

तर यापुढे देखील माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी विविध उपक्रम घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर दुस्सल यांनी केले. आभार सुशील थोरात यांनी मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button