१८१ पॉझिटिव्ह आढळले. दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सोमवारी आणखी १८१ पॉझिटिव्ह आढळले. दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला. २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४ हजार ४०६ झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९५ टक्के आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १४२९ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९, खासगी प्रयोगशाळेत ६२ आणि अँटीजेन चाचणीत ११० बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ५, नगर ग्रामीण ३, श्रीगोंदे १ रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत मनपा २०, अकोले १, जामखेड १, कर्जत १, नगर ग्रामीण ६, नेवासे १, पारनेर ४,

राहाता ९, राहुरी २, संगमनेर १२, शेवगाव २, श्रीगोंदे १, श्रीरामपूर २ रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा ५३, अकोले ११,

जामखेड ९, कर्जत ६, कोपरगाव ४, नगर ग्रामीण २६, नेवासे ८, पारनेर १५, पाथर्डी २०, राहाता २२, राहुरी १८, संगमनेर २३, शेवगाव ४, श्रीगोंदे १४,श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट ३ रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment