अबब! ‘त्या’ डाळिंब व्यापाऱ्याने शेतकऱ्याला लावला लाखोंचा गंडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- नगर जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फळांचे उत्पादन घेतले जाते. अनेक ठिकाणचे व्यापारी हा माल घेऊन जातात.

शेतकरीही या व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करत असतो. परंतु यात बऱ्याचदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा घटना घडलेल्या आहेत.

आता असाच एक फसवणुकीचा प्रकार श्रीरामपूर येथे घडला आहे. विजय ढौकचौळे व इतर काही शेतकऱ्याकडून तब्बल १५ लाख ७२ हजार रुपयांचे डाळिंब घेऊन त्याचे पैसे न देता त्याची फसवणूक केल्याचा प्रकार येथे घडला आहे.

या प्रकरणी अकबर अल्लाउद्दीन तांबोळी (रा.पिंपळगाव केतकी रोड, ता.दिंडोरी, नाशिक) याच्या विरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी : आरोपी अकबर तांबोळी याने नोव्हेंबर २०१८ ते २ नोव्हेंबर २०२० या काळात वेळोवेळी १५ लाख ७२ हजार ७६५ रुपयांच्या डाळिंबाची काही शेतकऱ्यांकडून खरेदी केली.

त्याबद्दल्यात आरोपीने शेतकऱ्यांना ‘स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिंडोरी’ या बँकेचे धनादेश दिले. मात्र, हे धनादेश बँकेत वटले नाहीत.

शेतकऱ्यांनी आरोपीच्या घरी जाऊन त्याला डाळिंबाच्या पैशांची मागणी केली. परंतु आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच नंतर मोबाइल बंद करून आरोपी पळून गेला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment