छत्रपतींनी उभे केलेले गड अन्‌ किल्ले आजही दिमाखदारपणे उभे आहेत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या युवा किंव तरुण पिढीला समजावा, तसेच छत्रपतींचा आदर्श प्रत्येकाने आंगिकारल्यास आजची पिढी सक्षम होण्यास मदत होईल.

१६व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र करुन रयतेचे राज्य निर्माण केले. महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये गडकिल्याची निर्मिती केली.

आजही हे गड अन्‌ किल्ले मोठ्या दिमाखदारपणे उभे आहेत. यातूनच छत्रपतींचा इतिहास समाजासमोर आजही तसाच आहे.

नगर जिल्ह्यातील युवकांना छत्रपतींचा इतिहास समजावा यासाठी इंद्रप्रस्थ टेकर्सने सहलीच्या माध्यमातून विविध किल्ले सर केले. तसेच त्याची माहिती देण्याचे काम केले.

यासाठी शरीफजी राजे, मालोजीराजे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठानच्यावतीने दुर्ग गडकोट, भ्रमंती, इतिहास,अभ्यासक व संशोधक आणि संवर्धन या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार नगरमधील इंद्रप्रस्थ टेकर्सला देण्यात आला आहे.

असे प्रतिपादन इतिहासकार किशोर कदम यांनी केले. शरीफजी राजे मालोजीराजे भोसले प्रतिष्ठानच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार इंद्रप्रस्थ टेकर्सचे वैभव लोटके,

पुष्कर देवरे यांना देताना इतिहासकार किशोर कदम. समवेत इतिहास परिषदेचे अध्यक्ष नारायण गवळी, इतिहास संशोधक भूषण देशमुख, ऊर्दू मोडीलिपी अभ्यासक संतोष यादव आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वैभव लोटके म्हणाले की, गेल्या ५ वर्षापासून नगर जिल्ह्यातून इंद्रप्रस्थ टेकर्सच्या माध्यमातून अनेक युवकांना छत्रपतींनी निर्माण केलेले किल्ले दाखविण्याचे काम केले.

तसेच छत्रपतींचा इतिहास प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सांगितला. काही किल्ले दोरीच्या सहाय्याने सरही केले. या माध्यमातून अनेकांना महाराष्ट्राच्या इतिहासाची जाणीव करून देण्याचे काम आम्ही वारंवार करत आहोत.

या पुरस्काराने जबाबदारी वाढली असून छत्रपतींचा इतिहास आम्ही सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम करु, असे ते म्हणाले. नगर तालुक्‍यातील भातोडी येथील शरीफराजे भोसले यांच्या ३९६ व्या स्मृतिदिनानिमित्त समाधी स्थळाचे पूजन करुन

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment