अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  ऊसतोडणी कामगार महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह मुळा कालव्याजवळ आढळून आला.

या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती बद्री चव्हाण यास ताब्यात घेतले आहे. कुक्कडवेढे परिसरातील मुळा उजव्या कालव्याजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली.

वांबोरी येथील साखर कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी कळंब (तालुका कन्नड) येथील ऊस तोडणी कामगार बद्री चव्हाण हा आठवडाभरापुर्वी आपली पत्नी व एक मुलासह कुक्कडवेढे येथे आला होता.

सोमवारी रात्री गंगुबाई बद्री चव्हाण (वय ४५) घरातून गायब झाली. मंगळवारी सकाळी गंगुबाईचा मुळा उजव्या कालव्याजवळ मृतदेह आढळला.

या घटनेची खबर मिळताच श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधीक्षक संदीप मिटके, सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागूल, उपनिरीक्षक नीरज बोकिल,

हवालदार आजीनाथ पाखरे, प्रभाकर शिरसाठ, संतोष राठोड, सुनील शिंदे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरला नेण्यात आला आहे.

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याचा राग अनावर झाल्याने बद्री चव्हाण याने पत्नी गंगुबाईला ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved