आमदार निलेश लंकेनी सुरु केली स्वताचीच वेबसाईट !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  खासदार सौ.सुप्रिया सुळे या आमदार निलेश लंके यांच्या वर्षपूर्ती सोहळ्या निमित्ताने संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा असणाऱ्या वेबसाईटचे संसद रत्न,खासदार सौ.सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सदर mlanileshlanke.com या संकेतस्थळावर जाऊन मतदार संघातील व संघा बाहेरील कुठलाही मतदार व इतर कुठलीही व्यक्तीला एक वर्षातील सर्व राजकीय-सामाजिक,शैक्षणिक व इतर कामाचा लेखाजोखा पाहता येणार आहे.

अशी माहिती आमदार निलेश लंके यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना दिली. यावेळी आ.निलेश लंके, तंत्रस्नेही शिक्षक संदीपजी गुंड व यांच्या सार्वभौम सामाजिक कार्याचा देशाचे नेते शरद पवार,पालक मंत्री ना.हसनजी मुश्रीफ, ना.छगन भुजबळ यांनी या आनोख्या कार्याचा गौरव करत त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

व महाराष्ट्रात तांत्रिक क्षेत्रात अनोखे योगदान देणाऱ्या या तंत्रस्नेहींना महाराष्ट्रात ओळख निर्माण करून देणार असे आश्वासित केले .आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेले अकोळनेर डिजिटल ग्राम या संकल्पनेतून तंत्रस्नेही संदीपजी गुंड यांनी देशातील हायटेक शाळा बनविण्याचा प्रयास वेबसाईट द्वारे सुप्रियाताईंना दाखविला

व या आशयाच्या शाळा संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा मानस आहे असे पारनेर नगरचे आमदार निलेशजी लंके यांना खासदार सुप्रियाताई सुळे यांना सुचित केले.पारनेर नगर विधानसभा मतदार संघात आमदार आपल्या दारी या नावाने ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर लवकरच जनतेच्या सेवेत देत असल्याचे व त्याची तयारी पूर्णत्वास आली आहे

असे आमदार लंके यांनी सुप्रियाताई सुळे यांना सांगितले.शुभारंभ झालेल्या वेबसाईटची निर्मिती दीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप गुंड यांच्या टीमने केले आहे.आमदार निलेश लंके आमदार झाल्या नंतरच्या सर्व योजना,विकास कामे,सामाजिक व शैक्षणिक कार्य, कोरोना संसर्गामुळे लॉक डाऊन मध्ये केलेले सामाजिक शैक्षणीक कार्य, ऑनलाईन शाळा ,

पोलीस अॅकेडमी,कोविड केअर सेंटर मधून हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवा देऊन महाराष्ट्रात ओळख निर्माण करणाऱ्या आमदारांचा संपूर्ण लेखाजोख्याचे बुधवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सभाग्रहात खा.सुप्रीया सुळे यांच्या हस्ते या वेब साईटचे लोकार्पण करण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment