Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingIndiaMaharashtra

अहमदनगर शहरात तुमच स्वताचे घर हवय ? ही माहिती वाचाच अवघ्या अकरा हजारांत…

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला स्वत:चे हक्काचे घरकुल मिळण्याचे स्वप्न पाहिले आहे व त्यादृष्टीने सरकारही विविध योजना आणत आहे.

सर्वसामान्यांच्या मनातील आपुलकीच्या घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी नगरमधील तीन बांधकाम व्यावसायिक फर्मनी एकत्र येत स्वप्नसाकार या गृहप्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

बोल्हेगाव परिसरात एमआयडीसी जिमखान्याजवळ सहा इमारतींचा, १६० फ्लॅट व २८ दुकाने असलेला सर्वसुविधांनी सुसज्ज असा प्रकल्प साकारण्यात येत आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पात फक्त ११ हजार रुपये भरून बुकिंगची संधी मिळणार आहे. यासाठी ७ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत स्वप्नपूर्तीचे अकरा दिवस ही योजना राबवण्यात येणार आहे.

यात बुकिंग करणाऱ्या पहिल्या ५१ ग्राहकांना चांदीची मुद्रा भेट दिली जाणार आहे. या प्रकल्पात १ बीएचके फ्लॅट फक्त ७.५१ लाखांच्या पुढे, तर २ बीएचके फ्लॅट ११ लाखांच्या पुढील किमतीत उपलब्ध होणार आहे,

अशी माहिती संजय गुगळे, सतीश पागा, प्रकाश मेहता यांनी दिली. या प्रतिष्ठित फर्मस््नी यापूर्वी नगरमध्ये कल्याण रोडवर शुभवास्तू हा २२४ फ्लॅटचा गृहप्रकल्प साकारला आहे.

बांधकाम क्षेत्राचा तब्बल तीन दशकांचा अनुभव असलेले क्लासिक असोसिएटसचे संजय गुगळे, तीस वर्षांपासून दर्जेदार बांधकामासाठी प्रसिध्द असलेले सतीश पागा,

लॅण्ड डेव्हलपर क्षेत्रातील अनुभवी मेहता इस्टेटस् अॅण्ड लॅण्ड डेव्हलपर्सचे प्रकाश मेहता या तिघांनी एकत्र येत स्वप्नसाकार गृहप्रकल्पाची उभारणी सुरू केली आहे.

सतीश पागा यांनी आतापर्यंत अनेक दर्जेदार गृहप्रकल्प, कमर्शियल प्रकल्प उभारले आहेत. गुलमोहोर रोडवरील लॅण्डमार्क प्रोजेक्ट त्यांच्या गुणवत्तेची साक्ष देतो.

क्लासिक असोसिएटस् हे नावही नगरच्या बांधकाम क्षेत्रात प्रतिष्ठित असून ३५० हून अधिक परिवारांना त्यांनी उत्कृष्ट घरे दिली आहेत. बांधकाम क्षेत्रातील उच्च गुणवत्तेसाठी क्लासिकला अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत.

संजय गुगळे हे क्रेडाई अहमदनगरचे माजी अध्यक्ष होते, तसेच क्रेडाई महाराष्ट्र शाखेतही ते कार्यरत आहेत. प्रकाश मेहता हे लॅण्ड डेव्हलपिंग आणि प्लॉटिंग क्षेत्रातील विश्वसनीय व ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

या सर्वांनी एकत्रितपणे स्वप्नसाकार गृहप्रकल्प उभारताना सर्व दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य दिले आहे. प्रकल्पाचे संपूर्ण कन्स्ट्रक्शन उत्कृष्ट दर्जाचे आरसीसी पध्दतीचे असणार असून ही बाजू प्रसिध्द विवेक आपटे यांची फर्म सांभाळणार आहे.

प्रकल्पाचे आर्किटेक्ट प्रितेश गुगळे आहेत. प्रकल्पातील सर्व फ्लॅट आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असणार आहेत. प्रकल्प रेरा नोंदणीकृत असून सर्व प्रकारच्या बँकिंग अर्थसाहाय्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मदत केली जाईल.

याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना २.६७ लाखांपर्यंतचे अनुदानही मिळू शकते. योग्य कागदपत्र असलेल्यांना ३५०० रुपये पासून प्रतिमहा हप्त्यातही वित्तीय संस्थांकडून गृह कर्ज मिळू शकते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button