अहमदनगर ब्रेकिंग : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील करुले शिवारात घरानजीकच्या विहिरीत उडी घेत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. दिलीप अर्जुन कोल्हे ( वय ४८ वर्षे ) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.

बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

करुले येथील शेतकरी दिलीप अर्जुन कोल्हे हे बुधवारी पहाटेपासून पाच वाजेपासून राहत्या घरातून बाहेर पडले होते. स्वताच्या घराजवळील विहीरीत उडी घेत त्यांनी आत्महत्या केली.

ते घरात आढळून न आल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. असता दुपारी दीड वाजेच्या सुमारास दिलीप कोल्हे यांचा मृतदेह घराजवळील विहीरीत आढळून आला.

Advertisement

दिलीप याचा भाऊ सतिश अर्जुन कोल्हे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत दिलीप कोल्हे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement