नीलेश लंके यांनी एक वर्षात तब्बल ६५ कोटी ४५ लाखांचा निधी आणला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-  कोरोना संकटामुळे निधीला कात्री लावण्यात आली असतानाही आमदार नीलेश लंके यांनी एक वर्षात तब्बल ६५ कोटी ४५ लाखांचा निधी खेचून आणला.

वर्षपूर्तीनिमित्त एमएलएनीलेशलंके डॉट कॉम या संकेतस्थळावर वर्षभरातील कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला आहे. या संकेतस्थळाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी अनावरण केले.

मुुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवारी अनावरण समारंभ पार पडला. दीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप गुंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संकेतस्थळाची निर्मिती केली असून विविध कामांसाठी मंजूर झालेला निधी,

कोरोनाकाळात केलेेले काम, शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर, टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर राबवलेले ऑलनाइन शाळा, पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खाकी अ‍ॅप आदी उपक्रमांसह विविध छायाचित्रे,

चित्रफितींचा त्यात समावेश करण्यात आला आहे. लवकरच ‘आमदार आपल्या दारी’ अ‍ॅप कार्यान्वीत करण्यात येणार असून त्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधण्यात येणार असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.

यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, दत्ता बाळ सराफ, राष्ट्रवादी विद्यार्थी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, गटविकास अधिकारी किशोर माने,

वनकुटयाचे सरपंच राहुल झावरे, संदीप गुुंड, बाळासाहेब खिलारी, संदीप चौधरी, श्रीकांत चौरे, नितीन चिकणे, बाळासाहेब लंके, संदीप ठाणगे, संभाजी वाळूंज, कांतीलाल भोसले आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment