भजन व कीर्तनासह मंदिरे खुली करावीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने मंदिरासह भजन-कीर्तन सेवा देखील बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, राज्यात आता हळूहळू सर्वत्र सर्व व्यवहार सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याने भजन-कीर्तनासह मंदिरे देखील खुली करावी,

अशी मागणी अखिल वारकरी जिल्हा संघाचे अध्यक्ष महेश महाराज हरवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

यावेळी वारकरी संघाचे गणेश महाराज सुडके, नामदेव महाराज मुखेकर, भाऊसाहेब महाराज पन्हाळकर, राजू महाराज अकोलकर, कान्हा महाराज, कृष्णा महाराज कुरे, गणेश महाराज शिंदे, लक्ष्मण महाराज जराड,

नानासाहेब महाराज मुखेकर उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष हरवणे महाराज म्हणाले, सरकारने मॉल, आठवडे बाजार, चित्रपटगृह सुरू केले आहेत.

परंतु भजन-कीर्तनासह मंदिरे मात्र अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. किती दिवस वारकऱ्यांचा सरकार अंत पाहणार आहे. त्यामुळे आता वारकऱ्यांच्या कीर्तनकारख् प्रवचनकार

यांच्यासह भाविकाच्या भावना तीव्र होण्यापूर्वी मंदिरे खुली करावी व सामूहिक भजन-कीर्तनात परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे हरवणे महाराज, सुडके महाराज, मुखेकर महाराज यांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment