Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

कोरोनामुळे एका दिवसात झाला ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे बुधवारी दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ८७७ झाली आहे. २६० नवे रुग्ण आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ५४ हजार ८६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

बुधवारी १९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४२६ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३९, खासगी प्रयोगशाळेत ७९ आणि अँटीजेन चाचणीत १४२ बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये मनपा हद्दीतील १८, नगर ग्रामीण ७, पारनेर ३, पाथर्डी ३, शेवगाव २, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट २, मिलिटरी हॉस्पिटल २ आणि इतर जिल्ह्यातील १ रुग्णाचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा ३३, अकोले ५, जामखेड १, नगर ग्रामीण १०, नेवासे ३, पारनेर ५, पाथर्डी २, राहाता ३, राहुरी ३, संगमनेर ११, श्रीरामपूर २ रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा १०, अकोले ५, जामखेड ९, कर्जत १२, कोपरगाव ५, नेवासे ६, पारनेर ६, पाथर्डी १९, राहाता ९, राहुरी ११, संगमनेर २९, शेवगाव १०, श्रीगोंदे ६, श्रीरामपूर ५ रुग्णांचा समावेश आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button