सरकार चालवण्याची हिंमत ठाकरे यांच्यात नाही काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार हेच खुद्द आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना मंत्रिमंडळातून काढून का टाकत नाहीत.

सरकार चालवण्याची हिंमत ठाकरे यांच्यात नाही काय? राज्याचे प्रश्न सोडवत नसाल तर खुर्चीवर बसता कशाला, अशा शब्दांत शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

बीड येथे मराठा आरक्षण विद्यार्थी युवा परिषदेत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर गायकवाड आयोगाचे माजी सदस्य सर्जेराव निमसे व सर्वोच्च न्यायालयातील वकील श्रीराम पिंगळे,

अमोल करांडे, सीए बी. बी. जाधव, प्रभाकर कोलंगडे, सुदर्शन धांडे, महंत शिवाजी महाराज, इंगळे महाराज, लक्ष्मण महाराज मेंगडे आदी उपस्थित होते. मेटे म्हणाले, आम्ही मराठा आरक्षणप्रश्नी ७ नोव्हेंबर २०२० रोजी मातोश्रीवर मशाल मार्च काढत आहोत.

आरक्षणासाठीची ही मशाल विचारांची असून तिचे स्वागत करा. अन्यथा ७ तारखेनंतर याच मशालीच्या ठिणग्या महाराष्ट्रात पडल्याशिवाय राहणार नाहीत. येत्या १० नोव्हेंबर रोजी या प्रश्नी शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहोत.

शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने समलैंगिक व तृतीय पंथियांसाठी चक्क एक सेल काढला आहे. परंतु, मराठा समाजाच्या भूमिकेवर आणि आरक्षणावर बोलायला त्यांना वेळ नाही, हे दुर्दैव आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment