Ahmednagar NewsAhmednagar NorthCrime

तू आमच्या नादी लागशील तर तुला ठार मारून टाकीन

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-मोबाईल न दिल्याच्या रागातून दोघा दारुड्यांनी एका व्यक्तीस लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केले आहे. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडली आहे.

याप्रकरणी नितीन विनायक चिटणीस वय ३५ याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, फिर्यादी नितीन चिटणीस हा संवत्सर येथील रहिवासी आहे.

तो आपल्या कामासाठी कोपरगाव येथे ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गेला होता. तो सकाळी साईबाबा कॉर्नर येथे घरी जाण्यासाठी वाहनाची वाट बघत होता.

तो उभा असताना तेवढ्यात दुचाकीवरून दोन दारुडे त्याच्याजवळ येऊन उभे राहिले. व दारुड्यानी नितीन यास मोबाईल मागितला. मात्र अनोळखी व्यक्ती असल्याने नितीनने त्यांना मोबाईल देण्यास नकार दिला.

त्याचा राग येऊन दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यास शिवीगाळ केली. ते तेथून निघून गेले मात्र काही वेळातच पुन्हा येऊन त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच त्यांच्याकडच्या लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केली. तसेच जाताना तू आमच्या नादी लागशील तर तुला ठार मारून टाकीन अशी धमकी दिली.

त्यांनतर मित्रांनी नितीनला खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. याप्रकरणी नितीन चिटणीस याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button