स्व. सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार कृष्णा वाळके व स्वप्नील मुनोत यांना जाहीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने देण्यात येणारा स्व. सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार 2020 यावर्षी नगरचे युवा लेखक दिगदर्शक कृष्णा वाळके व अभिनेता , निर्माता स्वप्नील मुनोत यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेचे अध्यक्ष उमेश घेवरीकर यांनी दिली.

यापूर्वी हे पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम व लेखक ,दिगदर्शक संदीप दंडवते यांना देण्यात आले असून या वर्षी आपल्या प्रतिभेच्या बळावर स्वतः सोबत नगरच्या मातीतील कलावंतांना सांस्कृतिक क्षेत्रात सन्मान मिळवून देणाऱ्या

कृष्णा वाळके व स्वप्नील मुनोत यांना हे पुरस्कार रविवार दि 8 नोव्हेंबर रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात अमरापूरकर कुटुंबियांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती शाखेचे उपाध्यक्ष भगवान राऊत व कार्यवाह माफीज इनामदार यांनी दिली.

पुरस्कारांची निवड शेवगाव नाट्य परिषदेचे मार्गदर्शक व जेष्ठ रंगकर्मी प्रा. रमेश भारदे व मधुकर देवणे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment