ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

नगरकरांनो लक्ष द्या; या दिवशी शहरात पाणी येणार नाही

0

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- वर्षाचे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. घरातील साफसफाई सुरु करण्यापूर्वी नगरकरांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

पाण्याचे नियोजन करूनच साफसफाई मोहीम हाती घ्यावी कारण शहरातील पाणी पुरवठा काही काळासाठी खंडित होणार आहे. अहमदनगर शहर पाणीपुरवठा योजनेवरील विळद पंपिंग स्टेशन येथील एक पंप काल नादुरुस्त झाला.

Advertisement

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा आज आणि उद्या विस्कळीत राहणार आहे, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले.

काल गुरुवारी (ता. 5) रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या सिद्धार्थ नगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रस्ता, तोफखाना, नालेगाव, कापड बाजार, आनंदी बाजार, स्टेशन रस्ता, विनायक नगर, बालिकाश्रम रस्ता, सावेडी उपनगर आदी भागाला पाणीपुरवठा होणार नाही.

Advertisement

या भागाला आज शुक्रवारी (ता. 6) पाणीपुरवठा करण्यात येईल. शुक्रवारी (ता. 6) रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहरातील झेंडी गेट, रामचंद्र खुंट,

हातमपुरा, कोठला, माळीवाडा, सारसनगर, बुरुडगाव आदी भागाला शनिवारी (ता. 7) पाणीपुरवठा करण्यात येईल. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement
li