Ahmednagar NewsAhmednagar NorthCrime

लग्न ठरले… साखरपुडा झाला आणि तिने विहिरीत उडी मारून जीव दिला

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- लग्न म्हंटले कि हुंडा, देणे घेणे या गोष्टींना जास्त महत्व दिले जाते. मात्र लग्न ठरले, साखरपुडा देखील झाला पण आपली फसवणूक झाल्याचे समजताच अंगाला हळद लागण्यापूर्वीच तरुणीने आत्महत्येचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली.

उभय कुटूंबाच्या संमतीने साखरपुडा होवून दागिन्यांसह पैशांची देवाण घेवाणही झाली. मात्र अवघ्या चार महिन्यात विवाहापूर्वीच तिला अपशकुनी ठरवून, विवाहास नकार दिला तसेच, पैसे व दागिने परत नेवून फसवणूक केल्याने, एका युवतीने विहीरीत उडी मारुन आपले जीवन संपवले. भारती भास्कर सांगळे (वय 26, रा. हंगेवाडी, ता. संगमनेर) असे त्या युवतीचे नाव आहे.

या बाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील हंगेवाडी येथील भारती भास्कर सांगळे (वय 26, रा. हंगेवाडी, ता. संगमनेर) हिचा चार महिन्यापूर्वीच विवाह ठरला होता. भारतीचा विवाह दोन्ही कुटूंबांच्या संमतीने ठरुन, 30 जून रोजी त्यांचा हंगेवाडी येथे साखरपुडा झाला होता.

दोन्ही कुटुंबांच्या समंतीने गोष्टी ठरल्याप्रमाणे आरोपीला एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी व दोन लाख रुपये विश्वासाने देण्यात आले होते. तर वरपक्षाने तिला दोन तोळे वजनाचे नेकलेस व कानातील दागिने दिले. यानंतर आरोपीने भारतीला दिलेले दागिने व्यवस्थित करुन आणून देतो, असे सांगून परत नेले होते.

रविवारी (ता. १) नोव्हेंबरला मयत भारती व तिचा भाऊ किरण अपशकुनी असल्याचे सांगत वरपक्षाने ठरलेला विवाह मोडला. तसेच सांगळे कुटूंबियांना शिवीगाळी व दमदाटी केली तसेच त्यांच्याकडून घेतलेले पैसे व दागिने परत देण्यास नकार दिला. या घटनेमुळे भारती व्यथित झाली होती.

यातून तिने टोकाची भुमिका घेत जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी किरण भास्कर सांगळे (वय 32) याने आश्वी पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून, वरपक्षाकडील चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण मदने, पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नयन पाटील पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button