साईकृपा कारखान्यातुन कोट्यावधी रुपयांच्या मुद्देमालाची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील श्री साईकृपा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्यातील मिल सेक्शन,

पॉवर हाऊस स्टेशन व स्विच यार्ड विभागातील पाच ट्रान्सफारर्मर मधील 48 हजार 880 किलो कॉपर व 25 हजार 680 लिटर ऑईल असा

एकूण 1 कोटी 41 लाख 88 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना जून 2020 ते 28ऑक्टोबर 2020 च्या दरम्यान घडली आहे.

या चोरीबाबत आज कारखान्याचे अधिकारी सुनील दरेकर यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved