अहमदनगर जिल्ह्यात ह्या कंपनीतील कामगारांना जबरदस्त दिवाळी बोनस !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-देशाच्या जडणघडणीमध्ये कामगाराचा वाटा महत्वाचा आहे. उद्योगाला भरारी देण्यासाठी कामगार रात्रंदिवस कंपनीमध्ये काम करून चांगल्या दर्जेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात काढत असतात.

त्यामुळे उद्योग क्षेत्राला भरारी मिळते. कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये संपूर्ण उद्योग क्षेत्र ठप्प असतांना कामगारांनी दर्जेदार उत्पादन करून उद्योगक्षेत्राला रूळावर आणण्याचे काम केले.

दिवाळी हा सण सर्वांना आनंद देणारा सण असल्यामुळे कामगारांची दिवाळी गोड होण्यासाठी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या प्रयत्नामुळे एमआयडीसीतील इटॉन कंपनीतील कायम स्वरूपी कामगारांना पंचवीस हजार रूपयांचा बोनस कामगाराच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे.

त्यामुळे कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे पदाधिकारी व इटॉन कंपनीतील व्यवस्थापकांची बैठक होऊन कामगारांना दिवाळी बोनस देण्यासाठी संघटना अग्रही होती. आमदार संग्राप जगताप यांनी कामगारांना जास्तीत जास्त बोनस मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.

कंपनी प्रशासनाने कामगार संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करून कामगारांना पंचवीस हजार रूपयांचा बोनस देण्याचा निर्णय कंपनी प्रशासनाने घेतला. व कंपनीने कामगाराच्या खात्यामध्ये पगार व पंचवीस हजार बोनस जमा केला, अशी माहिती अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment