मदतीसाठी बोलविलेल्या व्यक्तीकडूनच महिलेवर अत्याचार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यातच बहुतांश वेळा महिलांवरील होणारे अत्याचाराच्या घटना त्यांच्या परिचित व्यक्तींकडूनच झालेल्या आढळून आल्या आहेत.

असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडला आहे. भावाला पैसे देण्यासाठी सोबत नेलेल्या इसमानेच परतीच्या प्रवासात आडवाटेला नेवून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना संगमेनर तालुक्यात घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, निळवंडे येथील 25 वर्षीय महिलेने त्याच गावात राहणार्‍या सतीश संतु केरे याला विनंती करीत आपल्या भावाचे पैसे देण्यासाठी सिन्नर येथे येण्याची विनंती केली.

त्यानुसार आरोपीने संबंधित महिलेला आपल्या दुचाकीवरुन सिन्नरमध्ये नेले. परत येत असताना आरोपीने निर्मनुष्य ठिकाणी वाहन थांबवून तिच्याशी बळजबरी केली.

तिला दमबाजी करीत बळजबरीने तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली.

दुसर्‍या दिवशी संबंधित महिलेने तालुका पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. त्यावरुन पोलिसांनी आरोपी सतीश संतु केरे (रा.निळवंडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत आरोपीला तात्काळ अटक केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment