अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीच्या आत्महत्येनंतर प्रशांत गडाखही रूग्णालयात दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या, या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

गौरी प्रशांत गडाख (वय 38) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी रात्री उशीरा ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. गाैरी यांचे माहेर लोणी (ता. राहाता) येथील विखे कुटुंबियांत आहे. काल माहेरच्या मंडळींनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण उघड होणार आहे.

या सर्व घडामोडींच्या दरम्यान गाैरी यांचे पती प्रशांत गडाख हे पुणे येथील एका रुग्णालयात दाखल झाले आहेत,गाैरी यांच्या मागे पती यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख, आणि दोन मुली असा परिवार आहे. काल सायंकाळी सातच्या दरम्यान घटना घडल्यानंतर गाैरी यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते, ताथापि, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यानंतर हाॅस्पिटलच्या प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. आज सकाळी त्यांचा मृतदेह औरंगाबाद येथील घोटी रुग्णालयात उत्तरीय तपासणी नेण्यात आला. नगर येथील रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदनाची सोय नसल्याने शवविच्छेदन औरंगाबाद येथे होणार आहे.

गडाख कुटुंबीय नगरच्या राजकारणातील मोठं नाव असल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे.गौरी या यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत यांच्या पत्नी होत. तर राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी होत्या. गौरी यांचे माहेर लोणी (ता. राहाता) येथील आहे.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नात्यातील हे कुटुंब असून त्या थेट राजकारणात सक्रीय नसल्या तरी पती प्रशांत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्या कार्यरत होत्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment