अपघातात तरुणाचा दुर्देवी मृत्यू,दुर्देवी निधनामुळे परिसरात हळहळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- पारनेर सुपे रस्त्यावर रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात पारनेर शहरातील २२ वर्षीय युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला. रस्त्यावरील खडयांमध्ये मोटार आपटून ती बाजूच्या झाडास धडकून अपघात झाला.

अपघातात मोटारीचाही चक्काचूर झाला. शुभम अनिल इथापे (वय २२ रा. पारनेर) हा तरूण पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मोटारीने सुपे येथे निघाला होता. पारनेर – सुपे रस्त्यावर हंगा तलावाकडे जाणारा रस्ता ओलांडून मोटार पुढे निघाली असता रस्त्यांवरील खडडयांमध्ये मोटार आदळली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मोटार आदळल्यानंतर शुभमचे तिच्यावरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडास मोटारीची जोरदार धडक बसून रस्त्याच्या बाजूस फेकली गेली. त्यात मोटारीचा चक्काचूर होउन शुभम गंभीर जखमी झाला. तो जखमी अवस्थेतच मोटारीत अडकून पडला होता.

पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक नव्हती.  रस्त्याच्या बाजूस मोटार फेकली गेल्याने रस्त्यावरून तुरळक जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांच्याही अंधारामुळे ही बाब लक्षात आली नाही.  पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हंगे येथील तरूणांच्या निदर्शनास हा अपघात आला.

वाहनामध्ये शुभम इथापे हात युवक अडकला असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ १०८ रूग्णवाहीकेशी संपर्क करून त्यास नगर येथे उपचारासाठी पाठविले. नगरच्या  शासकिय रूग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने खासगी रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र तेथही उपचार होउ शकले नाहीत.

काही वेळानंतर शुभमचा मृत्यूू झाला. नगर येथे शुभम याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर दुपारी तिन वाजता पारनेर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शुभम हा अतिशय होतकरू युवक होता. विज वितरण कंपनीमध्ये ऑपरेटर म्हणून तो काम पाहत होता.

कंपनीतील कामाबरोबरच इतर व्यवसायातून दोन पैसे कसे कमवता येतील यासाठी त्याची नेहमी धडपड सुरू असे. व्यवसायाच्याच निमित्ताने सुप्याकडे निघालेल्या शुभमच्या मोटारीला अपघात झाला व त्यात त्याचे दुर्देवी निधन झाले. होतकरू  तरूणाच्या दुर्देवी निधनामुळे पारनेर शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment