ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

महिलेने तीन महिन्यांत केली तीन लग्ने; दागिने घेऊन झाली पसार

0

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- लॉकडाउनच्या काळात बेरोजगार झालेल्या महिलेचा आणि तिच्या पतीने फसवणुकीचा मार्ग अवलंबला. मात्र, नाशिकच्या एका तरुणामुळे त्यांचा भंडाफोड झाला.

औरंगाबादमधील या महिलेने तीन महिन्यांत तीन लग्ने केली आणि त्यांच्याजवळील दागिने चोरले. तीन महिन्यांत तीन लग्न करून त्यांच्याकडील दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या २७ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement

लॉकडाउनच्या काळात ती आणि तिचा पती बेरोजगार झाला होता. त्यामुळे त्यांनी हा मार्ग अवलंबल्याची माहिती समोर आली आहे. मागील तीन महिन्यांत तीन जणांनी लग्न केली.

मात्र, त्यांच्याकडील दागिने लुटून महिला पसार झाली. विजया असे या महिलेचे नाव असून, ती औरंगाबादमधील मुकुंदवाडी परिसरात राहते. नाशिक जिल्ह्यातील एका तरुणामुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

Advertisement

आपल्या पत्नीचा शोध घेत असताना, तिने नुकतेच अन्य एका तरुणाशी लग्न केल्याचे त्याला समजले. या तरुणाकडे ती जवळपास पंधरा दिवस राहिली.

त्यानंतर ती पळून गेली. तिने नंतर रायगडमधील कर्जत तालुक्यातील संदीप नावाच्या तरुणाशी लग्न केले. त्यानंतर तिने पश्चिम महाराष्ट्रातील एका तरुणाशी लग्न केले.

Advertisement

हे तिचे तिसरे लग्न होते. लग्नासाठी मुलींच्या शोधात असलेल्या तरुणांना जाळ्यात ओढून लग्न करायचे आणि त्यांना लुटण्याचे काम हे करत होते. या रॅकेटमध्ये महिला आणि तिचा पती सामील झाला होता.

लग्न ठरल्यानंतर ते लग्नासाठी झालेला खर्च आणि लग्नानंतर काही दिवसांतच ते पतीचे दागिने घेऊन पसार व्हायचे, अशी माहिती उघडकीस आली आहे.

Advertisement

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement
li