ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

एसपी साहेब गुन्हेगारीचा आलेख वाढतोय; कारवाईची आवश्यकता जाणवतेय

0

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची घसरण सुरु आहे तर दुसरीकडे गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला आहे. जिल्ह्यात खुलेआम गुन्हेगारीचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. आता रस्त्यावर फिरणे देखील धोकादायक बनत चालेल आहे.

कारण गेल्या काही दिवसांपासून शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. नव्याने पदभार स्वीकारणारे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आता आक्रमक भूमिका घेत गुन्हेगारीला वाचक बसावा यासाठी कठोर पाऊले उचलावी अशी नगरकर मागणी करू लागले आहे. दरम्यान सणासुदीच्या काळात शहरात लुटीच्या घटना वाढल्या आहे.

Advertisement

दुचाकीवरून आलेल्या तिघांनी रस्त्याने जाणार्‍या- येणार्‍या तिघांना अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा 41 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. रविवारी रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान या लुटीच्या घटना घडल्या. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघां अज्ञात चोरट्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी रात्री स्पोर्ट दुचाकीवरील तिघा भामट्यांनी शहरातील तीन ठिकाणी नागरिकांना आडवून लुटले. सुरवातीला सोनी गिफ्ट समोर सुधीर रणखांब यांना अडवून त्यांच्याकडील 6 हजाराची रोकड व 8 हजार रूपये किंमतीचा मोबाईल काढून घेतला. पुढे हे चोरटे कुष्ठधाम रोडला गेले.

Advertisement

तेथे रस्त्याने चाललेल्या अर्चना नंदकुमार भालेराव यांना अडवून त्यांच्या जवळील 7 हजाराची रक्कम व 5 हजाराचा मोबाईल काढून घेतला. चोरट्यांनी औरंगाबाद रोडवरील बीटीआर गेट समोर रस्त्याने जाणार्‍या शितळ संजयकुमार लोळगे यांना गाठून त्यांच्याकडील 7 हजाराची रक्कम व 8 हजाराचा मोबाईल काढून धूम ठोकली.

एकाच वेळी तीन ठिकाणी लुटीच्या घटना घडल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी शहरातील ठिकठिकाणी नाकेबंदी केली. परंतू, चोरटे मिळून आले नाही. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक निरीक्षक आर. एन. पिंगळे करीत आहे.

Advertisement

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement
li