अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या बँकेची कोट्यवधींची फसवणूक; जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर शहरातीक मर्चंट को-ऑप बँक लि. अ. नगर शाखेची १० कोटी २५ लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी अनिल साळी व उज्वला साळी या जोडप्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेने बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नितीन केवलचंद भंडारी, धंदा नोकरी, रा.श्रुती बंगला मार्केट यार्ड मागे, सारसनगर, अ. नगर यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिल राघो साळी, उज्वला अनिल साळी,

दोघे रा. प्लॉट क्र. आरएम ३०, एमआयडीसी नगर यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात फसवणुक ठकजबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन भंडारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मर्चंट को- ऑप बँक लि, शाखा नगरचे एमआयडीसी अ. नगर शाखेतून उज्वल इलेक्ट्रीकल्स स्टॅपिंग प्रा. लि. कंपनीचे संचालक आरोपी अनिल साळी,

उज्वला साळी यांनी सीडीबी कडील मशिनरी व कॅश क्रेडीट कर्ज बंद करुन टेकओव्हर करण्याकरिता तसेच व्यवसायाकरिता कर्ज प्रकरण करुन १० कोटी २५ लाख रुपये रकमेचे कर्ज घेवून टेकओव्हर कर्जाची माहिती सीडीबी बँकेला न देता तिची दिशाभूल करून सदर कर्जाची रक्कम चुकून जमा झाली,

असे भासवून काढून घेवून स्वत:च्या फायद्याकरिता वापरली तसेच नवीन मशिनरी खरेदी करिता घेतलेल्या कर्जांच्या रकमेतून मशिनरी खरेदी न करता रकमेचा गैरविनियोग करून मर्चंट बँकेची फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले असून सपोनि बोरसे हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment