काँग्रेस नेत्या दिवंगत रईसा शेख यांच्या निवासस्थानी जमली काँग्रेस कार्यकर्त्यांची मैफिल ; कार्यकर्त्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-नुकत्याच एका कार्यक्रमानिमित्त काँग्रेसच्या दिवंगत नेत्या रईसा शेख यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांची मैफिल जमली होती यावेळी आ.लहू कानडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शेख कुटुंबीय, कार्यकर्त्यांनी रईसा शेख यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्व. रईसाताई या काँग्रेसच्या नेत्या होत्या. त्या सन १९८९ ते १९९२ या काळामध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष होत्या. त्यांचा प्रदेश पातळी वरील नेत्यांशी चांगला जनसंपर्क होता.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. रईसाताई यांचे भाचे व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मुबीनभाई शेख यांच्या पुढाकारातून स्व. रईसाताई यांच्या निवासस्थानी काँग्रेसजन एकत्रित आले होते. यावेळी स्व. रईसाताई यांच्या बहिण डॉ. शकीलफातेमा शेख, प्रा. डॉ. रफियाफातेमा शेख

तसेच भाचे मुबीनभाई शेख यांनी स्व. रईसाताईंची काँग्रेस पक्षाशी असणारी एकनिष्ठता, त्यांनी काँग्रेस संघटना वाढीसाठी केलेले प्रयत्न, कार्यकर्त्यांना त्याची जोडण्याची पद्धत अशा त्यांच्या अनेक आठवणी यावेळी उपस्थित नेते, कार्यकर्त्यांना सांगितल्या. यावेळी आ. लहू कानडे म्हणाले की स्व. रईसाताई आणि माझे खूप चांगले संबंध होते.

त्या सच्चा काँग्रेस प्रेमी होत्या. त्यांनी कायम काँग्रेस पक्षाची विचारधारा मुस्लिम समाज बांधवांपर्यंत तसेच सर्व समाजापर्यंत पोहोचण्यासाठी कायम प्रयत्न केले. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की स्व. रईसाताई यांचा मला प्रत्यक्ष सहवास लाभला नाही हे मी माझे दुर्दैव समजतो.

परंतु मी लहान असताना माझे वडील गुलाबराव काळे हे काँग्रेसचे तत्कालीन पदाधिकारी असल्यामुळे ताईंच्या कामाला मी लहानपणापासून पाहत आलो आहे. त्यांच्याविषयी मला कायमच नितांत आदर आहे. त्यांच कुटुंब आजही काँग्रेस विचारांची अत्यंत मनापासून जोडलेला आहे याचा देखील मला अभिमान आहे.

ताईंचे भाचे मुबीनभाई शेख हे सतत काँग्रेस पक्षाच्या कार्यामध्ये सक्रियपणे सहभागी असतात. शेख कुटुंबीय हे काँग्रेससाठी एका परिवारा सारखेच आहेत, असे काळे यावेळी म्हणाले. यावेळी रंगलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये आ. कानडे, काळे, शेख कुटुंबीय यांच्यासह ज्ञानदेव वाफारे, राजेंद्र वाघमारे, नाथाभाऊ अल्हाट, अज्जूभाई शेख, अन्वरभाई सय्यद,

विजुभाऊ परदेशी, विशाल कळमकर, प्रवीण गीते, अमित भांड, प्रमोद अबुज, ॲड. माणिकराव मोरे, अशोक कानडे, मनसुख संचेती, शिवाजीराव जगताप, अनिसभाई चुडीवाल, बंटी यादव, गणेश अाप्रे, ॲड. चेतन रोहोकले, अक्षय कुलट, संदीप पुंड, चंद्रकांत उजागरे, मनोज चव्हाण आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment