Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrimeMaharashtra

कत्तलीसाठी जाणाऱ्या५ जनावरांची सुटका

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-कत्तलीसाठी पीकअपमधून नेण्यात येणाऱ्या ३ गायी व २ वासरांची सुटका आश्वी पोलिसांनी केली.

ही कारवाई शनिवारी रात्री ८.३० वाजता निमगावजाळीतील हॉटेल गोविंद गार्डन परिसरात झाली. वाहनचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कोल्हार-घोटी महामार्गावरुन चाललेल्या पीकअपमध्ये (एमएच १२ डीजी ८६३) कत्तलीसाठी जनावरे नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा रचून त्यांनी वाहन अडवले.

तपासणी केली असता तीन गायी व दोन वासरे आढळली. कॉन्स्टेबल नीलेश दादासाहेब वर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक गुफरान नसीर कुरेशी (संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button