दिवसभरात कोरोनाने एकही मृत्यू नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनामुळे सोमवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र, दिवसभरात नवे १६९ रुग्ण आढळून आले. चार महिन्यांत सर्वात कमी रुग्ण सोमवारी आढळले. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १३३४ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१, खासगी प्रयोगशाळेत ३७ आणि अँटीजेन चाचणीत ९१ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ११, जामखेड १, नगर ग्रामीण ८, नेवासे ७, पारनेर १, पाथर्डी ७, संगमनेर २, श्रीगोंदे २, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्ह्यातील १ रुग्णाचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा ९, अकोले २, नगर ग्रामीण २, नेवासे ८, पारनेर १, पाथर्डी १, राहाता २, राहुरी ३, संगमनेर ५, शेवगाव २, श्रीरामपूर २ रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा ४, अकोले १, जामखेड ८, कर्जत ३, कोपरगाव १०, नगर ग्रामीण ३, नेवासे १२, पारनेर २, पाथर्डी १४, राहाता ७, राहुरी ५, संगमनेर १२, शेवगाव २, श्रीगोंदे २, श्रीरामपूर ६ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८८८ जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत ५८ हजार २०९ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ५५,९८७ रुग्ण बरे झाले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment