नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये केलेल्या अनेक विकासकामांमुळे मिळाले भाजपला यश

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- बिहारमध्ये भाजप व मित्रपक्षाने आघाडी घेताच भाजपचे तालुकाध्यक्ष व जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

उपस्थितांना लाडू वाटण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांमुळे बिहारच्या जनतेने यश पारड्यात टाकले असल्याचे मत यावेळी दिनकर यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्रीखोलेश्वर गणपती चौकात दुपारी एकच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते जमले.

Advertisement

तालुकाध्यक्ष दिनकर, नगरसेवक सुनील वाघ, नगरसेवक सचिन नागपुरे, नगरसेवक राजेंद्र मापारी, ज्ञानेश्वर टेकाळे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निरंजन डहाळे, स्वप्निल मापारी, अजित नरुला, दीपक सोनवणे, आकाश शेटे, विवेक कंगुणे, अॅड. स्वप्निल साखरे, राम सचदे यावेळी उपस्थित होते.

भारतमाता की जय, मोदी है तो मुमकीन है अशा घोषणा देण्यात आल्या. तोफांची सलामीही देण्यात आली. दिनकर म्हणाले, पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये २७७५ किमी राष्ट्रीय महामार्ग चौपदरी केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५८ वर्षे गंगा नदीवर फक्त ४ पूल होते. सध्या १३ नवे पूल बांधले जात आहेत.

Advertisement

दोन पूल बांधून झाले असून ८ पुलांचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. २००५ पूर्वी कोसी नदीवर फक्त दोन पूल होते. आता चार पुलांचे काम सुरू आहे. प्रत्येक घरात वीज कनेक्शन दिले आहे. ग्रामीण भागात वीज १८ तास, तर शहरी भागात २४ तास वीज आहे.

हर घर नल का जलच्या माध्यमातून १.६२ कोटी कुटुंबांना शुद्ध पाणी पुरवठा, राज्य सरकारी नोकरीत महिलांना पस्तीस टक्के आरक्षण, मातृ वंदन योजनेच्या माध्यमातून १०.२ लाख महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे सहाय्य दिले गेले. शैक्षणिक दर्जा उंचावला.

Advertisement

मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांचे मोठे जाळे पसरवले. या कामांची पावती म्हणून बिहारच्या जनतेने हे यश भाजपच्या पारड्यात टाकले. इतर राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपला यश मिळाले असल्याचे दिनकर यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement