Ahmednagar NewsAhmednagar North

स्वतःचे अपयश झाकण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणे हा त्यांचा धंदा

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- स्वतःचे अपयश झाकण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करायचा धंदा या भागातील माजी जिल्हा परीषद सदस्य करत आहे . असा टोला माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी बाळासाहेब हराळ याचे नाव केले .

गुंडेगाव ( ता. नगर ) जिल्हा बँकेच्या वतीने खेळते भाडंवलचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी आ. बबनराव पाचपुते , समाजसेवक राजाराम भापकर , भैय्या लगड , बाजार समिती सभापती अभिलाष धिगे , उपसभापती संतोष म्हस्के , खरेदी विक्री संघाचे सभापती सु रेश सुंबे, श्रीकात जगदाळे ,

भाजपा जिल्हा मरचिटणीस दिलीप भालसिंग, दादासाहेब कासार , रेवणनाथ चोभे , नितीन लगड , भाऊसाहेब बोठे , बाबासाहेब जाधव , सुधीर भापकर , शिवाजी कार्ल, अनिल ठोंबरे , दादा दरेकर , देवराम कासार , मंगेश हराळ, शिवनाथ कोतकर , संतोष भापकर , नानासाहेब हराळ , सतिष चौधरी , संदिप भापकर उपस्थित होते .

यावेळी कर्डिले म्हणाले जिल्हा बँकेतील २१ संचालका पैकी सर्वात जास्त शेतकऱ्यांना खेळते भांडवलााच फायदा नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळवून दिला .१६८ कोटी रुपयाचे वाटप आत्ता पर्यत करण्यात आले . जवळपास अडीचशे कोटीपर्यत वाटप नगर तालुक्यातील शेतकऱ्याना होणार नाही .

ऐन दिवाळीत जिल्हा बँकेने शेतकऱ्याची दिवाळी गोड करण्याचे काम केले . मला भाजपने भरभरून दिले असल्याामुळे मी भाजप सोडून जाणार नाही .

पाचपुते म्हणाले मा. आ. कर्डीले यांनी जिल्हा बँक शेतकऱ्याच्या दारापर्यत पोहचवण्याचे काम काम केले .केंद्र सरकार सर्व सामन्य माणसाच्या घरापर्यत पोहचले गॅस , लाईट देण्याचे काम केले . यावेळी तीन कोटी सतरा लाख रुपयाचे वाटप यावेळी करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्ररसंचालन  संतोष  भापकर यांनी केले

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button