शहरातील स्वच्छतेकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष,साचताहेत कचऱ्याचे ढीग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-सर्वेक्षण आटोपताच शहरातील स्वच्छतेकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष झाले आहे. कंटेनरमुक्त नगर शहरात रस्त्यावर साचलेला कचरा वेळेत उचलला जात नसल्याने ढीग साचले आहेत.

स्वच्छ भारत अभियानात मोठी झेप घेणाऱ्या नगर शहरात पुन्हा एकदा कचऱ्याचा प्रश्न डोके वर काढू पहात आहे. महापालिकेने कचरा समस्या सोडवण्यासाठी खासगी एजन्सी नेमून घरोघरी कचरा संकलन सुरू केले.

संकलित केलेला कचरा कोणत्याही रॅम्पवर न नेता थेट डेपोत प्रक्रियेसाठी नेला जातो. स्वच्छ सर्वेक्षणाच्या विविध टप्प्यांत मनपाने शहर कंटेनरमुक्त घोषित करून सुमारे ११० कंटेनर काढून तेथे रस्त्यावर कचरा टाकल्यास कारवाईचा इशारा देणारे फलक लावले.

परंतु अभियानात चांगली कामगिरी केल्याची पावती मिळताच स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. मनपाने विविध ठिकाणी बसवलेल्या लहान कचराकुंड्या ओसंडून वहात आहेत.

मध्यवर्ती भागात रस्त्यावर साचलेल्या ढिगाऱ्याला मोकाट जनावरांनी गराडा घातला आहे. बंगाल चाैकी, इम्पिरियल चाैक यासह विविध भागात कचरा साचला आहे.

त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी वेळोवेळी सूचना देऊनही पुन्हा एकदा शहर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment