Ahmednagar NewsBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : बनावट डिझेल प्रकरणी मुख्य सुत्रधार देशमुखला अखेर अटक !आणखीही आरोपी वाढण्याची शक्यता …

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- शहरातील बनावट डिझेल प्रकरणी मुख्य सुत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे.बनावट डिझेल प्रकरणात बुधवारी रात्री डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुदस्सर देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान डिझेल रॅकेटचा मुख्य सूत्रधार शब्बीर आणि त्याचा मुलगा मुदस्सर असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात आणखीही आरोपी वाढण्याची शक्यता आहे.पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने राहता तालुक्यातील लोणी परिसरातून या दोघांना रात्री अटक केली आहे.

आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नगर शहरातील जीपीओ चौकात तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने छापा टाकून सुमारे दोन हजार लीटर बनावट डिझेल जप्त केले होते.

नगर शहरातील जीपीओ चौकात तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने छापा टाकून बनावट डिझेल जप्त केले होते. या प्रकरणाचा तपास शहर विभागाचे उपाधीक्षक विशाल ढुमे हे करत होते मात्र गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस उलटले तरी तपास योग्य प्रकारे होत नव्हता

अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे हा तपास वर्ग केला होता. तपास वर्ग झाल्यानंतर अवघ्या चार दिवसातच मिटके यांनी मुख्य सूत्रधाराला गजाआड केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button