ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

शाळांकडून पालकांची आर्थिक पिळवणूक ; शिवसेना झाली आक्रमक

0

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची प्रतीक्षा असली तरी खासगी शाळांकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीमुळे पालक त्रस्त आहेत.

शिक्षण विभागाचा अंकुश नसल्याने बेमालूमपणे मनमानी करणाऱ्या शाळांनी पालकांना शुल्कासाठी त्रास देणे सुरु केले आहे.

Advertisement

शहरातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा पालकांना दमदाटी करून ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या नावाखाली अवाढव्य फी वसूल करत आहे.

अशा शाळांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांना निवेदन देण्यात आले.

Advertisement

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे, लॉकडाऊनमुळे सर्वच कुटुंबांची वाताहत झाली आहे. त्यामुळे पालकांची आर्थिक स्थिती बिकट आहे.

त्यातच खाजगी इंग्लिश मिडीयम स्कूलकडून पालक लोकांना दमदाटी करुन ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फी ची मागणी संस्था चालकांकडून करण्यात येत आहे.

Advertisement

मुलाचे नाव शाळेतून कमी करण्यात येईल. निकालपत्र मिळणार नाही अशा धमक्या शाळेकडून मिळत आहेत. शहरात सुरु असलेले हे प्रकार तात्काळ थांबविण्यात यावे अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही विक्रम राठोड यांनी दिला आहे

यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, प्राध्यापक अंबादास शिंदे, महेश शेळके, अभिषेक भोसले, अक्षय नागपुरे, महेश राऊत, नरेश भालेराव, जगन्नाथ चांदकोटी यांच्यासह युवासेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement
li