Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrimeMaharashtra

कोयत्याचा धाक दाखवून डॉक्टरला लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर शहरात लक्ष्मी थिएटरजवळ डॉ.रमेश गोसावी यांची कार अडवून त्यांना मारहाण करून चष्मा तोडून, कार दगडाने फोडून त्यांच्याजवळील रोकड लुटणारा आरोपी शादाब याला ‘प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली काही तासातच शहर पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी शहर पोलीस सुत्रांनी सांगितले की, डॉ. गोसावी यांना मारहाण करुन लुटल्याचा प्रकार पोलिसात तक्रार येताच आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पोलिसांनी तपास सुरु केला.

त्यात शादाब जावेद शेख, वय- २३ रा. वेस्टन चौक वार्ड नं. २. श्रीरामपूर याला पकडण्यात आले. पकडलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरु असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button