धक्कादायक : बॉलीवूड अभिनेते आसिफ बसरा यांनी कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्याने गळफास घेऊन जीवन संपवले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत त्याच्या पहिल्या ‘काय पो छे’चित्रपटात काम केलेल्या अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, 53 वर्षीय बसरा यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेतील मॅक्लोडगंजमध्ये एका कॅफेजवळ आत्महत्या केली. त्यांनी आपल्या पाळीव कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्याने गळफास घेऊन जीवन संपवले.

आसिफ बसरा यांचा मृतदेह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अभिनेते आसिफ बसरा हे गेल्या पाच वर्षांपासून मॅक्लोडगंजमध्ये एका मैत्रिणीसोबत भाडे तत्त्वावर घेतलेल्या घरात राहत होते. त्यांची मैत्रिण परदेशी असून ते दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे म्हटले जाते.

आसिफ हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आशिकी २, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, ब्लॅक फ्रायडे, काय पो चे अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘काय पो छे’, ब्लॅक फ्रायडे, वन्स अपोन टाईम ईन मुंबई, आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक पण महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. ‘पाताललोक’ ही त्यांची शेवटची कलाकृती ठरली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी वन नाईट विथ किंग या चित्रपटात काम केले आहे.त्यांच्या आत्महत्येने बॉलिवूडला आणखी एक जबरदस्त धक्का बसला असून इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान असिफ हे गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, ज्या पाळीव कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्याने आसिफ यांनी आत्महत्या केली, तो कुत्राही बेपत्ता असल्याची माहिती आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment