Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : शेतात खुरपणी करणाऱ्या महिलेवर भरदिवसा बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- शेतात खुरपणी करणाऱ्या ३५ वर्ष वयाच्या तरुण महिलेवर भरदिवसा शेतात बलात्कार करण्याचा प्रकार घडल्याने पानोडीसह संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पानोडी परिसरातील एक ३५ वर्षांची महिला शेतात गवत खुरपणी करीत होती. तेथे आरोपी अण्णा लहानू घुगे, रा. पानोडी हा आला व माझे तुझ्यावर प्रेम आहे,

तू माझ्यासोबत चल,असे म्हणत बळजबरीने शेताच्या कडेला शेजारील ज्वारीच्या पिकाच्या बांधावर घेवून गेला. जेव्हा महिलेने जोरजोरात आरडा ओरड केली असता

अण्णा लहानू घुगे याने पहिलेस जिवे ठार मारण्याची धमकी दिली व तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार करून पळून गेला. यात महिला जखमी झाली आहे.

पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून आश्वी पोलिसात आरोपी अण्णा लहानु घुगे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button