धक्कादायक : अहमदनगर मध्ये पुन्हा वाढले कोरोना मृत्यू ! एकाच दिवशी झाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये २२८ जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. सध्या १ हजार ३९५ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना उपचारानंतर आज २४८ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान, कोरोनातील मृतांचा आकडा ९०० च्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. जिल्ह्यात आज कोरोना उपचारादरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत ८९७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयातील लॅबनुसार २५, खाजगी प्रयोगशाळेनुसार ७२ आणि अँटीजेन चाचणीत १३१ जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.

जिल्हा रुग्णालयानुसार अहमदनगर शहरात ०५, जामखेड ०१, नगर तालुका ०२, नेवासा ०७, पारनेर ०४, पाथर्डी ०१, संगमनेर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेनुसार अहमदनगर शहर १९, अकोले १२, कोपरगाव ०३, नगर तालुका ०४, नेवासा ०३, पारनेर ०१, राहाता ०७, राहुरी ०३, संगमनेर १४, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत अहमदनगर शहरात ०६, अकोले १३, जामखेड १०, कर्जत ०५ , कोपरगाव ०१, नगर तालुका ०१, नेवासा १२, पारनेर ०७, पाथर्डी २५, राहता ०६, राहुरी ०९, संगमनेर १३, शेवगाव ०८, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ०३, भिंगार शहर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment