माहेरच्या साडीने भगिनी गहिवरल्या.

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीत आपल्या आप्तस्वकीयांना भेटून भेटवस्तू ,फराळाचे पदार्थ, मिठाई देण्याची परंपरा आहे. ज्यांना भाऊ आणि माहेर असते अशा माता-भगिनींसाठी भाऊबीजेचा दिवस अगदी खास असतो.

हमखास प्रेमाचे प्रतिक असणारे वस्त्र आणि मिठाई त्यांना परंपरेने आपल्या भावाकडून दिली जाते. परंतु ज्यांना कोणीही भाऊ अथवा नातेवाईक नसतो, अशांसाठी दीपोत्सव दु:ख आणि निराशेचे शोकपर्व असते.

Advertisement

अशा वंचित माता-भगिनींना सामाजिक कार्यकर्ते धर्मराज शंकर औटी गुरुजींच्या प्रेरणा आणि प्रयत्नातून आज माहेरची साडी भाऊबीज म्हणून मिळाली.

नगर जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या सा-या माता-भगिनी ही भाऊबीज मिळाल्यावर अक्षरशः गहिवरल्या. ज्यांच्याशी आपले रक्ताचे नाते नाही किंवा ओळखही नाही असे भाऊ नवे नाते जोडण्यासाठी पुढे आल्याने कोणालाच अश्रू आवरले नाहीत.

Advertisement

अनौपचारिक पद्धतीने भावपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित भगिनीतर्फे पल्लवी गायकवाड, रंजना रणनवरे, जया जोगदंड, मीना पाठक आदींनी यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात महिलांच्या भावना व्यक्त केल्या.

आपल्याला मिळालेली माहेर ची साडी म्हणजे केवळ वस्त्र नसून जगण्याची उमेद आणि नवी आशा असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement

मागील १५ वर्षापासून औटी गुरुजी माहेरच्या साडीचे अभियान दिवाळीत राबवितात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके तर विशेष अतिथी म्हणून बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख, सदस्य प्रवीण मुत्याल, कोतवाली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत भंगाळे,

दिलासा सेलचे महिला उप निरीक्षक पल्लवी उंबरहंडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले,

Advertisement

सचिव ईश्वर बोरा , महानुभव पंथीय अनुयायी राजू कपाटे महाराज, सामाजिक कार्यकर्ते मयुराज औटी, म. इंदिरा भालसिंग, स्नेहालय पालक किरीटी मोरे,

अध्यक्ष संजय गुगळे,सचिव राजीव गुजरजेष्ठ आदी उपस्थित होते. स्नेहालय संस्थेतील तसेच ईतर कुटुंबाने नाकारलेल्या महिलांसाठी त्यांचे काही आजी – माजी आणि मित्र यांच्याकडून ऐच्छिक मदत घेऊन गुरुजी त्याच्या साड्या आणतात.

Advertisement

बाजारातील सुमारे ५०० रुपये सरासरी किमतीच्या साड्या विकत घेवून त्या भाऊबीजेच्या निमित्ताने अशा भगिनींना दिल्या जातात.

माहेरची साडी या उपक्रमात मा. किरीटी मोरे, मा. बलसेकर सर, मा. प्रविण बोरा, मा. अशोक चांदणिया, मा. राजू कपाटे महाराज, मयुराज औटी, इंदिरा भालसिंग, जगदंबा साडी सेंटर आदी या ”भगिनींचे भाऊ” उपस्थित होते.

Advertisement

कार्यक्रमाचे प्रास्तविक स्नेहालय संस्थेचे संस्थापक सदस्य गिरीश कुलकर्णी, सूत्रसंचालन विशाल अहिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रवीण मुत्याल यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक बुरम, आकाश काळे, प्रविण बुरम, अशोक चिंधे, संजय जिंदम, फिरोज पठाण, अंबादास शिंदे, मझहर खान, सविता करांडे, आशा जाधव, आदींनी प्रयत्न केले

Advertisement

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

Advertisement

 

Advertisement